नाशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- प्रभा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनीक व श्री स्वामी समर्थ केंद्र, नाशिराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. 28 मे 2026 रोजी मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सायंकाळी 5 ते 8 या वेळेत श्री स्वामी समर्थ केंद्र, न्यू इंग्लिश स्कूल समोर, नाशिराबाद येथे पार पडणार आहे.या शिबिरात प्रसिद्ध रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉ. युवराज रोटे (B.D.S., M.D.S.) हे उपस्थित राहून नागरिकांची मोफत दंत तपासणी करणार आहेत. तसेच तोंडाच्या विविध शस्त्रक्रियांवर विशेष सवलत देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. ही सवलत शिबिरात उपस्थित राहणाऱ्या रुग्णांसाठीच लागू राहणार आहे.
शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजक श्री स्वामी परिवार, नाशिराबाद यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी श्री.गणेश चव्हाण (मो. 7385018778) तसेच, श्री.मुकुंद रोटे (मो. 9421213738) यांच्याशी संपर्क साधावा.

