Sunday, May 31, 2026
police dakshta logo
Homeक्राईमघोडसगाव पुलावर दरोड्याच्या तयारीत असलेले दोघे जेरबंद; गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे व...

घोडसगाव पुलावर दरोड्याच्या तयारीत असलेले दोघे जेरबंद; गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे व स्कॉर्पिओ जप्त

मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मुक्ताईनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोन संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, स्कॉर्पिओ वाहनासह सुमारे 5 लाख 60 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 6 वाजेच्या सुमारास आशियाई नागपूर महामार्गावरील घोडसगाव पुलाजवळ काही इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चंद्रकांत विष्णू वाघ (वय 30) व कैलास कारभारी घोडके (वय 32) या दोघांना ताब्यात घेतले. तर त्यांचे अन्य तीन साथीदार घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे.तपासादरम्यान आरोपींकडून एक स्कॉर्पिओ वाहन, गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, मोबाईल फोन, बनावट नंबर प्लेट, दोरी, लोखंडी रॉड व मिरची पावडर जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 5,60,400 रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 228/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 310(4) तसेच शस्त्र अधिनियम कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, पोलीस निरीक्षक आर्षीकुमार आडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी राजेंद्र चाटे पुढील तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या