Friday, June 5, 2026
police dakshta logo
Homeजळगावपर्यावरण दिनानिमित्त जनमत प्रतिष्ठान व वेदांत एज्युकेशनतर्फे वृक्षारोपण

पर्यावरण दिनानिमित्त जनमत प्रतिष्ठान व वेदांत एज्युकेशनतर्फे वृक्षारोपण

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जनमत प्रतिष्ठान व वेदांत एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली.जनमत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंकज नाले हे गेल्या १५ वर्षांपासून पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम सातत्याने राबवत आहेत. याच परंपरेनुसार यंदाही राज विद्यालय तसेच जिल्हा पेठ पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

या उपक्रमात माजी महापौर सौ. जयश्रीताई महाजन, नगरसेविका, राज विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, पोलीस दक्षताचे मुख्य संपादक चंदन पाटील, दैनिक साईमत व मंडे टू मंडे चे वार्ताहर दीपक लोखंडे, जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पीएसआय संजय भांडारकर, संजय दोरकर, संजय सोनवणे, भरत चव्हाण, आरती कुमावत मॅडम, शशिकांत इंगळे, वेदांत एज्युकेशनच्या संचालिका हर्षली ढाके तसेच जनमत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंकज नाले आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि हरित परिसर निर्मितीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.

या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली असून परिसरात हरित वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या