Saturday, June 13, 2026
police dakshta logo
Homeक्राईमनाशिराबाद पोलिसांचे जनहितार्थ आवाहन : संशयित व बेवारस वाहनांची माहिती तात्काळ द्या

नाशिराबाद पोलिसांचे जनहितार्थ आवाहन : संशयित व बेवारस वाहनांची माहिती तात्काळ द्या

नाशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नाशिराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच चोरीस गेलेल्या वाहनांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचे जनहितार्थ आवाहन केले आहे. परिसरात संशयास्पद, बेवारस अथवा दीर्घकाळापासून वापरात नसलेली वाहने आढळल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार, विनानंबर प्लेट असलेली वाहने, एकाच ठिकाणी अनेक दिवसांपासून उभी असलेली वाहने, संशयास्पद स्थितीत आढळणाऱ्या दुचाकी अथवा चारचाकी तसेच नंबर प्लेट काढलेली किंवा झाकलेली वाहने याबाबत नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.अशा वाहनांचा वापर गुन्हेगारी कृत्यांमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलिसांनी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.नागरिकांनी आपल्या परिसरात संशयास्पद वाहन दिसल्यास वाहनाचा क्रमांक, ठिकाण व इतर आवश्यक माहिती नाशिराबाद पोलीस स्टेशनशी संपर्क साधून कळवावी. माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गुन्हेगारीमुक्त आणि सुरक्षित समाजनिर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून आपले कर्तव्य बजावावे, असे आवाहन नाशिराबाद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी केले आहे.
संपर्क : नाशिराबाद पोलीस स्टेशन – 02572-2356333, आपत्कालीन मदत – 112.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या