भुसावळ | जितेंद्र काटे | पोलीस दक्षता लाईव्ह :- तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दिपनगर येथे बलकर चालक, ट्रक चालक ,यांची काॅर्नर मिटींग घेऊन वाहतूक च्या नियमांचे पालन करणे , वेग मर्यादा चे पालन करणे , वाहन चालवताना मोबाईल चा वापर न करणे , मद्यपान करून वाहन न चालवणे , वाहनाचे वैध कागदपत्रे सोबत ठेवणे , धोकादायक पद्धतीने ओव्हर टेक न करणे अशा प्रकारे माहिती देऊन वाहतूक नियमांचे सूचना पत्रक वाटप करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक महेश गायकवाड , गुप्तवार्ता चे विनोद पाटील , योगेश पालवे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते तसेच कुऱ्हा पानाचे येथे अपघात मुक्त जनजागृती कार्यक्रम घेऊन रिक्षा चालक मालक , वाहन चालक यांना वाहतुकीचे नियम सांगून वाढत्या फेटल अपघाताच्या दृष्टीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार मार्गदर्शन करण्यात येऊन हेल्मेट वापरणाऱ्या वाहन चालकांचे गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी पोलीस निरीक्षक महेश गायकवाड , पोहेकाॅ विकास बाविस्कर , धिरज मंडलिक , सुभाष सोनवणे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी दिपनगर व कुऱ्हा पानाचे येथे वाहनचालकांनी चांगला प्रतिसाद दिला.

