Wednesday, June 17, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणतीन दशकांनंतर पुन्हा जुळल्या मैत्रीच्या नाती; न्यू इंग्लिश स्कूलच्या 1994 बॅचचा स्नेहमेळावा...

तीन दशकांनंतर पुन्हा जुळल्या मैत्रीच्या नाती; न्यू इंग्लिश स्कूलच्या 1994 बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- न्यू इंग्लिश स्कूल, नशिराबाद येथील मार्च 1994 च्या दहावी बॅचमधील वर्गमित्र-मैत्रिणी तब्बल तीन दशकांनंतर एकत्र येत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. शाळा सोडल्यानंतर अनेक जण एकमेकांच्या संपर्कात नसल्याने हा मेळावा सर्वांसाठीच भावनिक आणि संस्मरणीय ठरला.दहावीच्या विविध बॅचचे गेट-टुगेदर होत असल्याचे पाहून आपल्या बॅचलाही एकत्र आणण्याचा संकल्प काही माजी विद्यार्थ्यांनी केला. यासाठी गेल्या वर्षभरापासून संपर्क मोहिम राबविण्यात आली. अखेर सर्वांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे हा स्नेहमेळावा यशस्वीरीत्या पार पडला.

सर्व वर्गमित्र-मैत्रिणींनी शाळेत एकत्र येऊन एका वर्गाची विशेष सजावट केली होती. वर्गात बसून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देताना अनेकांनी स्वतःचा पुन्हा परिचय करून दिला. अनेक वर्षांनंतर भेट झाल्याने काही जणांना एकमेकांची ओळख पटविणेही कठीण झाले होते. यावेळी सर्वांनी आपल्याला घडविणाऱ्या गुरुजनांच्या आठवणींनाही उजाळा दिला.या स्नेहमेळाव्यास 55 हून अधिक वर्गमित्र-मैत्रिणी उपस्थित होते. दिवाळीनंतर अधिक व्यापक स्वरूपात पुन्हा एक स्नेहमेळावा आयोजित करून अद्याप उपस्थित राहू न शकलेल्या सर्व सहाध्यायांना सहभागी करून संपूर्ण बॅच एकत्र आणण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.मेळाव्यानंतर सर्वांनी एकत्रित स्नेहभोजनाचा आनंद घेतला. तसेच बॅचमधील मिलिंद बारी यांनी शाळेची प्रतिमा असलेले आकर्षक स्मृतिचिन्ह स्वरूपातील कप सर्वांना भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला.

हा स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी राजू पाचपांडे, विनोद भोळे, विलास चौधरी यांच्यासह इतर वर्गमित्रांनी घेतलेल्या विशेष परिश्रमांचे उपस्थितांनी कौतुक केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे तीन दशकांनंतर सर्व मित्र-मैत्रिणींना पुन्हा एकत्र येण्याचा आनंददायी योग जुळून आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या