Monday, June 29, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणप्रगती शिक्षण मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड

प्रगती शिक्षण मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड

४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- प्रगती शिक्षण मंडळ, नशिराबादची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. सभेत संस्थेच्या गतवर्षातील शैक्षणिक, प्रशासकीय व विकासात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच संस्थेच्या भावी वाटचालीसंदर्भात विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

यावेळी संस्थेच्या नवीन कार्यकारिणीची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानुसार वंदन युवराज वाणी यांची अध्यक्षपदी, वसंत रामकृष्ण चौधरी यांची उपाध्यक्षपदी, गोवर्धन नारायण पाटील यांची सचिवपदी तर सौ. ललिता युवराज वाणी यांची शिक्षण तज्ज्ञ म्हणून निवड करण्यात आली.तसेच सुधीर दिगंबर मोहरीर, सदाशिव रोटे, श्रीकांत लीलाधर चौधरी, अनंता मंगलदास सदाफळे, डॉ. विजय वाणी, नेव्हील चौधरी तसेच डॉ. सौ. विरल वाणी यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रा. युवराज राजाराम वाणी होते. त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन करून आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या शैक्षणिक परंपरेला अधिक बळकटी देत गुणवत्तापूर्ण शिक्षण, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि समाजाभिमुख कार्याच्या माध्यमातून संस्थेची वाटचाल अधिक सक्षम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.सभेचा समारोप उपस्थित सदस्यांचे आभार मानून उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या