Monday, July 27, 2026
police dakshta logo
Homeअपघातडंपरच्या निष्काळजीपणामुळे मुक्ताईनगरात विद्युत तारा तुटल्या; सिमेंट पोल कोसळला, जीवितहानी टळली

डंपरच्या निष्काळजीपणामुळे मुक्ताईनगरात विद्युत तारा तुटल्या; सिमेंट पोल कोसळला, जीवितहानी टळली

वीजपुरवठा खंडित; घरांतील उपकरणांचे नुकसान, चालकाविरुद्ध पोलिसांत लेखी तक्रार

 

मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मुक्ताईनगर शहरातील वॉटर सप्लाय कार्यालयाजवळ रविवारी (दि. 26 जुलै) रात्री सुमारे 11.20 वाजण्याच्या सुमारास डंपर चालकाच्या निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना घडण्याचा प्रसंग उद्भवला. डंपरच्या ट्रॉलीचा हायड्रॉलिक भाग वर करून वाहन चालविल्याने रस्त्यावरील विद्युत तारा तुटून खाली पडल्या. या घटनेमुळे परिसरातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला, तसेच काही घरांतील विद्युत उपकरणांचे नुकसान झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.या घटनेत महावितरणचा सिमेंटचा वीजखांबही तुटून रस्त्यावर कोसळल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटना घडली तेव्हा परिसरात महिला व नागरिकांची वर्दळ असल्याने मोठी जीवितहानी टळली. नागरिकांनी आरडाओरड करून डंपर चालकाला वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी मुक्ताईनगर येथील रहिवासी शोभा सहदेव तायडे यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून, संबंधित डंपर चालक व वाहनाशी संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.दरम्यान, या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. निष्काळजीपणे जड वाहने चालविणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करून अशा घटनांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या