कोथळीत अवैध दारू विक्रीला ऊत; भररस्त्यावर खुलेआम व्यवसाय, ग्रामस्थांचा संताप
कोथळी (ता. मुक्ताईनगर) : मुक्ताईनगर तालुक्यातील भुसावळ रोडवरील कोथळी गावात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पूर्वी काही ठराविक ठिकाणी सुरू असलेली ही विक्री आता थेट भररस्त्यावर खुलेआम होत असल्याचे चित्र समोर येत असून, त्यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी खुलेआम मद्यविक्री व मद्यपान होत असल्याने लहान मुले, युवक तसेच महिलांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. यामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत असून महिलांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. भररस्त्यावर सुरू असलेल्या या अवैध व्यवसायाकडे संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने अवैध दारू विक्रेत्यांचे मनोबल वाढल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
RELATED ARTICLES

