Saturday, August 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावपत्रकार संघटनेत प्रविण पाटील यांची नवी जबाबदारी; डिजिटल मीडिया विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष

पत्रकार संघटनेत प्रविण पाटील यांची नवी जबाबदारी; डिजिटल मीडिया विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :-महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईच्या डिजिटल मीडिया विभागाच्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी पत्रकार प्रविण श्रावण पाटील यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या माध्यमातून डिजिटल पत्रकारांच्या विविध प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्यासह जिल्ह्यातील पत्रकारांना संघटित करण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या मार्गदर्शनानुसार ही नियुक्ती करण्यात आली. यानिमित्ताने राज्य कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्या हस्ते पाटील यांना अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले.डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेता या क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना संघटनात्मक पाठबळ मिळावे, त्यांच्या अडचणी व प्रश्न संबंधित पातळीवर मांडले जावेत आणि पत्रकार संघटनेचा जिल्ह्यातील विस्तार अधिक व्यापक व्हावा, या दृष्टीने प्रविण पाटील कार्यरत राहणार आहेत.
पाटील यांच्या नियुक्तीचे पत्रकारिता क्षेत्रासह सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले. सचिन गोसावी, नगराज पाटील, भूषण महाजन, भगवान मराठे, संतोष नवले, योगेश सैतवाल, गोपाल सोनवणे, संजय चौधरी, अबरार मिर्झा, चंदू खरे यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन करून नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या