भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांची नुकतीच भुसावळ शहर पोलीस ठाण्यात बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी एरंडोल येथून बदली होऊन आलेले पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी तालुका पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला आहे.दरम्यान, जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रोबेशनरी पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत दरेकर यांची दि. १० ऑगस्ट रोजी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे तालुका पोलीस ठाण्याच्या प्रभारी कार्यभाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.यावेळी सुनसगाव येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र काटे यांनी पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांचा शाल व पुस्तके देऊन सत्कार केला. याप्रसंगी तालुका पोलीस ठाण्याचे रीडर एएसआय संजय तायडे, पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल धीरज मंडलिक आदी उपस्थित होते.