Friday, August 14, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणशालेय विद्यार्थ्यांना अमली पदार्थांविरोधात जनजागृतीचे धडे

शालेय विद्यार्थ्यांना अमली पदार्थांविरोधात जनजागृतीचे धडे

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शालेय विद्यार्थी सुरक्षा समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नशिराबाद पोलीस स्टेशनच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांविषयी जनजागृती करण्यात आली.यावेळी पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी यांनी जळगाव पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘राईज’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, त्यापासून दूर राहण्याचे आवाहन तसेच अमली पदार्थांची विक्री किंवा हाताळणी करणाऱ्या व्यक्तींबाबत माहिती मिळाल्यास तातडीने पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.तसेच विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी किंवा मदतीची आवश्यकता असल्यास ‘११२’ हेल्पलाइन क्रमांकाचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले. यावेळी सायबर सिक्युरिटीबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.पोलीस कर्मचारी युगंधरा नारखेडे यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत ‘गुड टच-बॅड टच’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास पोलीस कर्मचारी विशाखा कोकरे, रामकृष्ण माळी यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका एस. ए. बनसोडे, उपमुख्याध्यापक अनिल चौधरी, पर्यवेक्षक एस. एन. पाचपांडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन आर. के. जोशी यांनी केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या