जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जनमत प्रतिष्ठान व वेदांत एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सकल ध्यान महोत्सव, पुस्तक प्रकाशन व ज्ञानवंत उद्योजक-शिक्षक पुरस्कार सोहळा २०२६’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे हे सहावे वर्ष असून शिक्षक दिनानिमित्त विशेष उपक्रम म्हणून शिक्षक तसेच विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा गौरव करण्यात येणार आहे.या कार्यक्रमात ज्ञानवंत उद्योजक, उत्कृष्ट शिक्षक, ब्युटी अकॅडमी आणि विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांचा विशेष सन्मान करण्यात येणार असून ५१ ज्ञानवंत उद्योजक व शिक्षकांचा भव्य पुरस्कार देऊन सत्कार केला जाणार आहे. यासोबतच ‘सकल ध्यान महोत्सव’, विशेष पुस्तक प्रकाशन सोहळा आणि विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा गौरव हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहेत.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते निळकंठ आप्पा गायकवाड, माजी डायट प्राचार्य हे असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. राजूमामा भोळे, आमदार जळगाव शहर, सौ. दिपमाला काळे, महापौर जळगाव शहर; तसेच सौ. जयश्रीताई महाजन, माजी महापौर, राज विद्यालय संचालिका यांची उपस्थिती राहणार आहे.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी जि.प.जळगाव; डॉ.अनिल झोपे, प्राचार्य डायट, जळगाव, प्रा.रफीक शेख, रायसोनी कॉलेज, उमेशभाऊ नेमाडे, अध्यक्ष, ओबीसी सेल उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, विवेक मंगलसिंग सोनवणे, युवा नेतृत्व; एस. डी. भिरूड, जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी, जळगाव, डॉ. सौ. केतकीताई पाटील, संचालिका गोदावरी फाऊंडेशन, अतुल मालखेडे सर, प्राचार्य खिरोदा, अॅड. निखिल पाटील, विधी तज्ज्ञ, सौ. रुपालीताई वाघ, अनुभूती शाळा पी.आर.ओ.; मा. दिलीप भारंबे, विज्ञान प्रसारक, सौ. गायत्रीताई भंगाळे, माजी नगराध्यक्ष भुसावळ; योगेश पाटील, न्यू इंग्लिश स्कूल नशिराबाद; तसेच डॉ.संदीप पाटील, पारोळा यांची उपस्थिती राहणार आहे.
हा कार्यक्रम रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील अल्पबचत भवन, जळगाव येथे होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत बडगुजर सर करणार असून कार्यक्रम वेळेवर सुरू होणार असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.
दरम्यान, पुरस्कारासाठी नाव नोंदणी सुरू असून इच्छुकांनी आपले नाव व संपूर्ण माहिती आयोजकांकडे पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व पुरस्कारार्थी व आमंत्रित प्रमुख पाहुण्यांनी सकाळी ९ वाजता वेळेवर उपस्थित राहावे, असेही आयोजकांनी कळविले आहे. सन्मान व सत्कारासाठी कोणतेही मानधन दिले जाणार नसून, उपस्थिती आपल्या आमंत्रणासाठी व सत्कारासाठी आवश्यक असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
आयोजक : जनमत प्रतिष्ठान व वेदांत एज्युकेशन