Saturday, August 15, 2026
police dakshta logo
Homeजळगावसंस्कृती माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात

संस्कृती माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मेहरूण येथील संस्कृती माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून प्रभात फेरीत सहभाग घेतल्याने परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमासाठी लिनेस क्लबच्या अध्यक्षा मा. सौ. रेशमा बेहराणी, श्री. किशोर बेहराणी (लँड डेव्हलपर्स), जय दुर्गा महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका मा. सौ. जयश्रीताई सुनील महाजन, जय दुर्गा ग्रुपचे सचिव श्री. ललितभाऊ धांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य श्री. ज्ञानेश्वरदादा नाईक तसेच जय दुर्गा ग्रुप, मेहरूण, जळगावचे संचालक मा. श्री. अनिलदादा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मा. सौ. रेशमा बेहराणी व श्री. किशोर बेहराणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.‘अमृत महोत्सव–हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी कवायत, गीतगायन, भाषणे, देशभक्तीपर गीते तसेच नृत्याचे सादरीकरण केले. विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. तसेच मा. सौ. जयश्रीताई महाजन, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. डिंपल येवले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक, माजी विद्यार्थी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मनीषा जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती अश्विनी फालक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकवर्ग यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या