नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा क्रमांक २, नशिराबाद येथे स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे (SMC) अध्यक्ष अमजद खान सर उपस्थित होते.यावेळी विद्यार्थिनींनी विविध उपक्रम, देशभक्तीपर भाषणे तसेच देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून कार्यक्रमात उत्साह निर्माण केला. विशेषतः इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या उत्कृष्ट देशभक्तीपर अभिनयाने उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमास केंद्रप्रमुख हैदर शाह उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागाचे तसेच शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमांचे कौतुक केले. विद्यार्थिनींनी विविध उपक्रमांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना विविध बक्षिसे व भेटवस्तू देऊन प्रोत्साहित करण्यात आले.अत्यंत आनंददायी, उत्साहपूर्ण व प्रसन्न वातावरणात विविध देशभक्तीपर उपक्रमांनी स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.