Sunday, August 16, 2026
police dakshta logo
Homeजळगावशेठ ला.ना.सार्वजनिक विद्यालयातर्फे ३०० फूट लांबीची भव्य तिरंगा रॅली उत्साहात

शेठ ला.ना.सार्वजनिक विद्यालयातर्फे ३०० फूट लांबीची भव्य तिरंगा रॅली उत्साहात

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- ७९व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान, देशप्रेम, राष्ट्रभक्ती, सांस्कृतिक जाणीव व राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ व्हावी, या उद्देशाने शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयातर्फे ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ या उपक्रमांतर्गत ३०० फूट लांबीच्या भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. देशभक्तीच्या उत्स्फूर्त वातावरणात पार पडलेल्या या रॅलीमुळे संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीने भारावून गेला.रॅलीचे प्रमुख आकर्षण म्हणजे एन.सी.सी. पथकातील कॅडेट्स तसेच विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सन्मानपूर्वक सादर केलेला ३०० फूट लांबीचा भव्य तिरंगा ध्वज. शाळेच्या प्रांगणातून देशभक्तीपर गीतांच्या निनादात रॅलीला सुरुवात झाली. शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत हातात तिरंगा घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीत सहभाग घेतला. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक संजय वानखेडे, ज्येष्ठ पर्यवेक्षिका रमा तारे, पर्यवेक्षक जगदीश साळुंखे, एन.सी.सी. विभाग प्रमुख श्रीकांत घुगे आणि क्रीडा विभाग प्रमुख उल्हास ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.मुख्याध्यापक सचिन देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यलढा, स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग व बलिदान, राष्ट्रप्रेम तसेच शिस्तीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. एन.सी.सी. विभाग प्रमुख श्रीकांत घुगे, क्रीडा प्रमुख उल्हास ठाकरे, पंकज खंडाळे व हेमंत सपकाळे यांनी रॅलीचे नियोजन व व्यवस्थापन केले.या उपक्रमास आनंदा चौधरी, आनंद पाटील, सोमनाथ महाजन, प्राजक्त प्रचंड, प्राजक्ता गोहिल, रेवती किन्हीकर, मनिषा वानखेडे, संगीता कुलकर्णी, स्मिता करे, सुनीता रोटे, योगेश सोनजे, पंकज महाले, प्रेम सारस्वत, सुनील अंबिकर, सरजू निंभोरकर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थी व शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ३०० फूट तिरंगा रॅली अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि देशभक्तीमय वातावरणात यशस्वीपणे पार पडली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या