जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जय दुर्गा भवानी क्रीडा मंडळ, मेहरूण संचलित लिटल चॅम्प्स प्री-प्रायमरी स्कूल, जयदुर्गा प्राथमिक, माध्यमिक व कै. कौतिक चावदस महाजन उच्च माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पूजा अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून जळगाव महानगरपालिकेच्या महापौर जयश्रीताई महाजन उपस्थित होत्या. यावेळी संस्थेचे सचिव ललितभाऊ धांडे, उपाध्यक्ष अनिलदादा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य ज्ञानेश्वरदादा नाईक, अग्रवाल महिला मंडळाच्या सदस्य, अखिल भारतीय मारवाडी महिला मंडळाच्या पदाधिकारी, संस्थेच्या सचिव भावनाजी अग्रवाल, सल्लागार ललिता अग्रवाल, स्नेहल अग्रवाल, शीतल अग्रवाल, इनर व्हील क्लबच्या सदस्य, एस. के. ऑइल इंडस्ट्रीजचे संचालक धीरज अग्रवाल, रोटरी क्लबचे अध्यक्ष रोहितजी अहुजा, धनराज कासट, सचिव पुणेतजी तलरेजा, सचिव योगेशजी साकला, तुषार भांबरे, रोटरी क्लबचे सदस्य तसेच एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक चंद्रकांत पाटील यांच्यासह प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सागर कोल्हे व ज्येष्ठ शिक्षक महेंद्र पाटील आदी उपस्थित होते.स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यालयाच्या वतीने निळकंठ नगर, महाजन नगर, सप्तशृंगी कॉलनी, स्वामी समर्थ चौक, एमडीएस कॉलनी, एकनाथ नगर, तुळजा माता नगर व सिद्धार्थ नगर परिसरातून प्रभातफेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून ‘विविधतेत एकता’चा संदेश दिला.यावेळी तंबाखूमुक्तीची प्रतिज्ञा तसेच महिला लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारणासंदर्भातील प्रतिज्ञा घेण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, गीतगायन, रांगोळी, निबंध व चित्रकला आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना राजगिरा, चिप्स, फरसाण, लाडू व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल तडवी यांनी केले, तर आभार महेश बच्छाव यांनी मानले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.