जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- गुरु इंटरनॅशनल स्कूलमध्ये १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात पार पडला. यावेळी शाळेच्या परिसरात देशभक्तीचा उत्साह संचारला होता.कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नशिराबादचे शहराध्यक्ष गणेश नथ्थु चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पांडे क्लासेसचे संचालक पांडे सर, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी विजय पाटील सर, वंदनाताई पाटील, स्नेहाताई सोनवणे, गुरु इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष अनिल सपकाळे सर तसेच मुख्याध्यापिका आशाताई सपकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.ध्वजारोहणानंतर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत देशाच्या प्रगतीसाठी जबाबदार नागरिक म्हणून योगदान देण्याचे आवाहन केले. यावेळी गणेश नथ्थु चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी गुरु इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थ्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखेर उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.