Saturday, August 22, 2026
police dakshta logo
Homeक्राईमशेळगावात अवैध वाळू वाहतूक व साठ्यावर नशिराबाद पोलिसांची कारवाई; ४ लाख ६...

शेळगावात अवैध वाळू वाहतूक व साठ्यावर नशिराबाद पोलिसांची कारवाई; ४ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शेळगाव परिसरात अवैध वाळू वाहतूक व साठ्यावर नशिराबाद पोलिसांनी कारवाई करत सुमारे २५ ब्रास वाळूसह एक ट्रॅक्टर असा एकूण ४ लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अवैध वाळू वाहतूक व नदीपात्रालगत वाळूचा बेकायदेशीर साठा करणाऱ्या चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास नशिराबाद पोलिसांचे पथक शेळगाव परिसरात गस्तीवर असताना अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर निदर्शनास आले. पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवून चालकाची चौकशी केली असता त्याच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही वैध परवाना अथवा आवश्यक कागदपत्रे आढळून आली नाहीत.चालकाकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदर वाळू शेळगावकडील तापी नदीपात्रालगतच्या गायरान जागेत स्वतःसह साथीदारांनी केलेल्या अवैध साठ्यातून भरून आणल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात अवैधरित्या साठवून ठेवलेली वाळू आढळून आली. पोलिसांनी कारवाई करत सुमारे २५ ब्रास वाळू आणि एक ट्रॅक्टर असा एकूण ४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नशिराबाद पोलीस ठाण्याचे स.फो.संजय महाजन करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या पथकाने केली. पथकात पो.हे.कॉ.गुणवंत देशमुख, पो.हे.कॉ.गिरीष शिंदे, पो.का.भरत बाविस्कर, पो.का.पंकज सोनवणे स.फो रियाजोद्दीन काझी यांचा समावेश होता.नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू उत्खनन, वाहतूक व साठा करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, अशा प्रकारची माहिती नागरिकांनी नशिराबाद पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या