Wednesday, August 26, 2026
police dakshta logo
Homeक्राईमईदच्या पार्श्वभूमीवर नशिराबाद पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; रेकॉर्डवरील १६ आरोपी चार दिवसांसाठी हद्दपार!

ईदच्या पार्श्वभूमीवर नशिराबाद पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; रेकॉर्डवरील १६ आरोपी चार दिवसांसाठी हद्दपार!

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- आगामी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच शांतता व सलोख्याचे वातावरण कायम राहावे, यासाठी नशिराबाद पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील १६ आरोपींना चार दिवसांसाठी हद्दपार (तडीपार) करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.सणाच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि शांतता भंग होऊ नये, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित आरोपींवर नशिराबाद पोलीस ठाण्यात दुखापत करणे, शांतता भंग करणे यांसह विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दिनांक २५ ऑगस्ट २०२६ ते २८ ऑगस्ट २०२६ या चार दिवसांच्या कालावधीत संबंधित आरोपींवर हद्दपारीची कारवाई लागू राहणार आहे. हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून संबंधित आरोपी हद्दीत आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नशिराबाद पोलिसांनी दिला आहे.दरम्यान, ईदचा सण सर्वांनी शांततेत, उत्साहात आणि बंधुभावाने साजरा करावा. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह किंवा तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट शेअर करू नयेत, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास नागरिकांनी तात्काळ नशिराबाद पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन नशिराबादच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या