Thursday, October 8, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणनशिराबाद येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत मोटारसायकल रॅली

नशिराबाद येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत मोटारसायकल रॅली

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- नशिराबाद येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘सेवा हाच संकल्प… राष्ट्रसेवा हेच ध्येय!’ या संकल्पनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारप्रमुख म्हणून २५ वर्षांच्या सेवापर्वानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.रॅलीचा शुभारंभ भवानी मंदिर येथे तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. या रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रहित, देशसेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता सेवा, समर्पण आणि राष्ट्रहिताच्या विचारांचा वाहक असून संघटनेची ताकद व एकजूट प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने या मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केलेल्या मार्गदर्शनाचे प्रसारण करण्यात आले. ‘विकसित भारत-२०४७’ या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी प्रत्येक कार्यकर्त्याचा सहभाग महत्त्वाचा असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. या कार्यक्रमाचे चित्रण एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून उपस्थितांना दाखविण्यात आले.कार्यक्रमास भाजप पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, भाऊसाहेब पाटील, मिलिंद चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी केली.यावेळी भाजप न.पा. गटनेते लालचंद पाटील, नगरसेवक प्रदीप बोढरे, मनोज पाटील, सचिन चौधरी, किरण पाटील, राजेंद्र पाचपांडे तसेच खंडेराव नगर, अण्णा नगर परिसरातील बूथप्रमुख व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद रंधे यांनी केले, तर आभार कीर्तीकांत चोबे यांनी मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या