Thursday, November 5, 2026
police dakshta logo
Homeक्राईमनशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई; गोमांस विक्री प्रकरणातील पती-पत्नी सहा महिन्यांसाठी हद्दपार

नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई; गोमांस विक्री प्रकरणातील पती-पत्नी सहा महिन्यांसाठी हद्दपार

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :-नशिराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध गोमांस विक्रीचा व्यवसाय केल्याच्या प्रकरणात सराईत गुन्हेगार असलेल्या पती-पत्नीला सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. मुख्तार जमाल कुरेशी आणि त्याची पत्नी प्रवीण मुख्तार कुरेशी अशी हद्दपार करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्तार जमाल कुरेशी आणि प्रवीण मुख्तार कुरेशी हे नशिराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध गोमांस विक्रीचा व्यवसाय करत होते. त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे परिसरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण होत असल्याने पोलिसांनी त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे पाठविला होता.या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर दोघांनाही सहा महिन्यांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्यात आले आहे. नशिराबाद पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार देशमुख, पोलीस हवालदार चंद्रकांत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल भरत बाविस्कर आणि पोलीस कॉन्स्टेबल पंकज सोनवणे यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या