नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दिवाळी २०२६ निमित्त वाचनप्रेमींसाठी विशेष वाचन योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अवघ्या २०० रुपयांत चार महिन्यांसाठी दिवाळी अंक वाचण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे वाचनप्रेमींना विविध विषयांवरील दिवाळी अंकांचा आनंद घेता येणार आहे.गेल्या ११० वर्षांची परंपरा लाभलेल्या सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्या वतीने वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दिवाळी अंकांच्या माध्यमातून साहित्य, संस्कृती, कला, सामाजिक विषय तसेच विविध क्षेत्रांतील वैचारिक आणि मनोरंजक लेखन वाचकांपर्यंत पोहोचते. या अंकांचे वाचन अधिकाधिक वाचकांना करता यावे, हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे.
दिवाळी अंक वाचनासाठी सार्वजनिक वाचनालयाची विशेष योजना; २०० रुपयांत चार महिन्यांचा लाभ
RELATED ARTICLES

