नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद परिसरात अवैध वाळू वाहतुकीविरोधात महसूल विभागाने कारवाई करत वाळूने भरलेला डंपर पकडला. शुक्रवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास सुनसगाव रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.महसूल विभागाच्या पथकाला एमएच १९ झेड ९९९० क्रमांकाचा डंपर अवैधरीत्या वाळूची वाहतूक करताना आढळून आला. या डंपरमध्ये अंदाजे चार ब्रास वाळू असल्याचे निदर्शनास आले. संबंधित वाहनचालकाकडे वाळू वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे आढळल्याने महसूल पथकाने सदर डंपर ताब्यात घेतला. नायब तहसीलदार डी. बी. जाधव, मंडळ अधिकारी योगिता पाटील आणि ग्राम महसूल अधिकारी नशिराबाद रुपेश ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील दंडात्मक कारवाईसाठी सदर डंपर प्रशासकीय इमारतीच्या आवारात जमा करण्यात आला. यावेळी वाहन जमा करण्याच्या प्रक्रियेसाठी नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी रितेश चौधरी यांच्यासह पोलीस पथकही उपस्थित होते.
अवैध वाळू वाहतुकीविरोधात महसूल विभागाने केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध गौण खनिज वाहतुकीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

