Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमअल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकास पोलिसांनी घेतले ताब्यात

अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकास पोलिसांनी घेतले ताब्यात

जामनेर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह;- जामनेर तालुक्यातील एका खेड्यात अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका संशयिताविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत आरोपीला अटक करण्यात आली आहे. गोकुळ सुनील पारधी (रा. वाघारी ता. जामनेर) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने १२ जून रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गावातील राहत्या घरात तिने आत्महत्या केली होती. तिच्या वडिलांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी आणि मयत तरुणीचे प्रेम संबंध होते अशी माहिती मिळाली आहे. मात्र तरुणीचे लग्न संबंध निश्चित झाले होते पण मुलीचे वय पूर्ण झाल्यानंतर विवाह होणार होता. मात्र संशयित आरोपी गोपाळ याने तिला लग्न मोडायला सांगितले. नाही तर मी प्रेम संबंधांबद्दल माहिती सांगेल अशी धमकी दिली. तरुणीने आई-वडिलांची बदनामी नको म्हणून लग्न मोडले. मात्र संशयित आरोपी गोपाळ याने तरी देखील ” तुझे फोटो-व्हिडिओ व्हायरल करेल ” असे सांगून पैशांची मागणी करू लागला. त्यामुळे तरुणाच्या वारंवार होणाऱ्या जाचास कंटाळून तरुणीने आत्महत्या केली. त्यामुळे तिच्या पित्याने जामनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी संशयित गोपाळ पारधी याला अटक केली आहे. पुढील तपास जामनेर येथील पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या