Sunday, July 5, 2026
police dakshta logo
Homeअमळनेरअंमळनेर मनसे तालुका सचिवपदी पवन शिंदे यांची नियुक्ती

अंमळनेर मनसे तालुका सचिवपदी पवन शिंदे यांची नियुक्ती

अंमळनेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशान्वये तसेच जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संदीप पाचंगे व आशिष साबळे यांच्या नेतृत्वाखाली, मनसेचे जळगाव जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे यांच्या मार्गदर्शनाने अंमळनेर तालुका सचिवपदी पवन आबा शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अंमळनेर तालुका अध्यक्ष संदीप पाटील (काटे) यांच्या हस्ते ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे, पक्ष संघटना अधिक मजबूत करणे तसेच तालुक्यात मनसेचा प्रचार-प्रसार प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी पवन शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.यावेळी पक्ष पदाधिकाऱ्यांनी पवन शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या