Tuesday, June 23, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याभुसावळ तालुका पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष रेवसिंग पाटील बेपत्ता; कुटुंबीयांसह सहकाऱ्यांची चिंता...

भुसावळ तालुका पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष रेवसिंग पाटील बेपत्ता; कुटुंबीयांसह सहकाऱ्यांची चिंता वाढली

भुसावळ | जितेंद्र काटे | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील कन्हाळे बुद्रुक येथील रहिवासी तथा भुसावळ तालुका पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष आणि पोलीस पाटील रेवसिंग भाऊराव पाटील हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांच्या अचानक बेपत्ता होण्यामुळे कुटुंबीयांसह पोलीस पाटील संघटनेतील पदाधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेवसिंग पाटील हे दि. १६ जून रोजी सकाळी “दारुबंदी संदर्भातील बैठकीसाठी जळगाव येथे जाऊन येतो,” असे कुटुंबीयांना सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र त्यानंतर ते परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. विविध ठिकाणी शोधमोहीम राबवूनही त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नसल्याने अखेर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान, भुसावळ तालुक्यातील पोलीस पाटील बांधवांनीही विविध ठिकाणी जाऊन स्वतः शोधकार्य सुरू ठेवले आहे. प्राथमिक माहितीनुसार, रेवसिंग पाटील हे मनमाड स्टेशन परिसरातून कोपरगाव-शिर्डी मार्गाकडे गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

रेवसिंग पाटील हे अत्यंत मनमिळाऊ आणि सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी अचानक घर सोडून जाण्यासारखा निर्णय का घेतला, त्यांना कोणाकडून काही धमक्या मिळाल्या होत्या काय, याबाबतही विविध तर्क-वितर्क व्यक्त होत असून पोलिसांनी सर्व अंगांनी तपास करण्याची मागणी होत आहे.सध्या त्यांच्या बेपत्ता होण्यामुळे कुटुंबीय पूर्णपणे सैरभैर झाले असून त्यांचा लवकरात लवकर शोध लागावा, अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या