Saturday, May 2, 2026
police dakshta logo
Homeअमळनेरअमळनेर–जळोद बस सेवा सुरू करण्याची मागणी; अन्यथा मनसेचा आंदोलनाचा इशारा

अमळनेर–जळोद बस सेवा सुरू करण्याची मागणी; अन्यथा मनसेचा आंदोलनाचा इशारा

अमळनेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- तालुक्यातील अमळगाव गांधीली येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना वाहतुकीच्या गैरसोयीमुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने अमळनेर ते जळोद तसेच अमळगाव गांधीली मार्गावर बस सेवा सुरू करण्यासाठी मा. आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले आहे.सध्या लासूर बस या ठिकाणी थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचणे कठीण होत आहे. विशेषतः परीक्षांचा कालावधी सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर सकाळी ८ वाजता अमळनेर ते जळोद या मार्गावर विशेष बस सुरू करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दरम्यान, मागणी मान्य न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना तालुका अध्यक्ष संदीप पाटील (काटे), शहराध्यक्ष धनंजय साळुंखे, शहर उपाध्यक्ष महेश सुतार, तालुका उपाध्यक्ष निलेश चौधरी, तालुका सचिव निलेश भावसार, शहर उपाध्यक्ष आदित्य दोरकर, शहर उपाध्यक्ष जय बोरसे यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या