Saturday, May 2, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याविवाह सोहळ्यातून सामाजिक बांधिलकीचा आदर्श : वायकोळे परिवाराकडून दिव्यांगांसाठी ब्लाइंड स्टिकचे दान

विवाह सोहळ्यातून सामाजिक बांधिलकीचा आदर्श : वायकोळे परिवाराकडून दिव्यांगांसाठी ब्लाइंड स्टिकचे दान

सावदा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- समाजाप्रती आपली जबाबदारी जपण्याचा आदर्श वरणगाव (जि. जळगाव) येथील वायकोळे परिवाराने घालून दिला आहे. श्रीराज वायकोळे व कीर्ती टोंगळे यांचा विवाह २१ एप्रिल २०२६ रोजी सावदा येथे उत्साहात संपन्न झाला. या मंगल प्रसंगी त्यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला यांच्या मोबिलिटी ट्रेनिंग कॅम्पसाठी ब्लाइंड स्टिकचे दान करून सामाजिक जाणीवेचे दर्शन घडविले.आनंदाच्या क्षणी दिव्यांग बांधवांना मदतीचा हात देत वायकोळे परिवाराने समाजासमोर एक सकारात्मक संदेश ठेवला आहे. विशेष म्हणजे, दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सौ. नीता यशवंत वायकोळे व संपूर्ण वायकोळे कुटुंब सातत्याने सहकार्य करत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

या उपक्रमाबद्दल दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला चे संस्थापक व अध्यक्ष डॉ. विशाल कोरडे यांनी नवदांपत्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. फाउंडेशनच्या वतीनेही श्रीराज व कीर्ती यांच्या सामाजिक जाणीवेचा गौरव करण्यात आला.यावेळी सौ. नीता वायकोळे यांनी, “प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरातील शुभकार्याच्या प्रसंगी अशा प्रकारे दान करून दिव्यांग बांधवांना आपल्या आनंदात सहभागी करून घ्यावे,” अशी भावना व्यक्त केली.

या उपक्रमामुळे विवाह सोहळ्याला सामाजिक बांधिलकीची अनोखी जोड मिळाल्याचे उपस्थितांनी सांगितले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या