Monday, May 4, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याचांगदेव शिवारात अवैध दारू विक्रीला ऊत; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

चांगदेव शिवारात अवैध दारू विक्रीला ऊत; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव शिवार परिसरात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय पुन्हा एकदा जोरात सुरू झाल्याचे चित्र समोर आले आहे. या प्रकाराकडे स्थानिक पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून, परिस्थिती गंभीर बनली आहे.गावठी दारूची खुलेआम विक्री होत असल्याने परिसरातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणात त्याच्या विळख्यात अडकत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, इतक्या उघडपणे सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे या व्यवसायाला कुणाचे संरक्षण मिळत आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

संतांची परंपरा लाभलेल्या चांगदेव गावाची प्रतिमा या प्रकारामुळे मलिन होत असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पोलीस यंत्रणेची निष्क्रियता की संगनमत, याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे.दरम्यान, संबंधित प्रकरणात तातडीने कठोर पावले उचलली नाहीत, तर नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या