Thursday, July 2, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याफैजपूरच्या सुपुत्राची भरारी; प्रमोद पाटील यांची महिंद्रा अँड महिंद्रामध्ये जनरल मॅनेजरपदी पदोन्नती

फैजपूरच्या सुपुत्राची भरारी; प्रमोद पाटील यांची महिंद्रा अँड महिंद्रामध्ये जनरल मॅनेजरपदी पदोन्नती

फैजपूर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- फैजपूर येथील सुपुत्र प्रमोद लक्ष्मण पाटील यांची महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या चाकण (पुणे) येथील संशोधन व विकास (आर अँड डी) विभागात जनरल मॅनेजर पदावर पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे फैजपूरसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रमोद पाटील हे गेल्या २४ वर्षांपासून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये कार्यरत असून त्यांनी आपल्या मेहनत, प्रामाणिकपणा, तांत्रिक कौशल्य आणि प्रभावी नेतृत्वाच्या जोरावर ही मानाची पदोन्नती मिळवली आहे. संशोधन व विकास क्षेत्रात कार्य करताना त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करून कंपनीच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे.ते जळगाव जिल्हा परिषद शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण रामू पाटील यांचे सुपुत्र असून स्वर्गीय सौ. ताराबाई पाटील (उपशिक्षिका) यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या या यशामुळे फैजपूर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

प्रमोद पाटील यांच्या पदोन्नतीबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, सहकारी तसेच हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही ते आपल्या कार्यातून कंपनीचे तसेच महाराष्ट्राचे नाव अधिक उंचावतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या