मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यातील महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या वीज कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांच्या विविध समस्यांचा आढावा ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत घेतला. या वेळी कामगारांना भेडसावणाऱ्या अडचणी गांभीर्याने लक्षात घेऊन त्यावर तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीत कंत्राटी कामगारांच्या वेतन, सेवा अटी, सुरक्षितता आणि इतर मूलभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने कार्य करावे, असेही निर्देश देण्यात आले.या बैठकीस महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरणचे वरिष्ठ अधिकारी तसेच भारतीय मजदूर संघ प्रणित कंत्राटी कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

