Wednesday, September 23, 2026
police dakshta logo
Homeआरोग्यमहाजन नगरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

महाजन नगरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महाजन नगर, मेहरूण येथे श्री. महालक्ष्मी मित्र मंडळाच्या वतीने शनिवार, दि. २७ सप्टेंबर रोजी मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्री. चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व श्री. पी. ई. तात्या पाटील रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात परिसरातील सुमारे ५०० नागरिकांची तपासणी करण्यात आली.

नवरात्री महोत्सवानिमित्त मंडळाचे अध्यक्ष अल्पेश भाऊ देवरे यांच्या पुढाकाराने हे शिबिर पार पडले. यावेळी होमिओपॅथी तज्ञ डॉ.सुरेश अग्रवाल, डॉ.सिद्धेश्वर पाटील, डॉ.अमिता श्रीवास्तव, नेत्रचिकित्सक डॉ.जयेश वाल्हे, फिजिओथेरपी तज्ञ डॉ.अभिलाषा मुंदडा तसेच प्रशिक्षणार्थी डॉ.प्राची खलसे, देवयानी चव्हाण, भावना दातीर, हर्षदा पाटील, श्रद्धा चौधरी यांनी महाजन नगर, मेहरूण परिसर व रामेश्वर कॉलनीतील नागरिकांची तपासणी केली.

शिबिरात “नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान” अंतर्गत १९ गरीब व गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी मुकेश भाऊ नाईक, नवल परदेसी, आकाश सोनवणे यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष पी. ई. तात्या पाटील, सचिव राहुल पाटील, प्राचार्य सुधांशू सिंग व रुग्णालय अधीक्षक डॉ.नरेंद्र शर्मा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या