Wednesday, September 23, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याचिंचखेडा बुद्रुकमध्ये एस.टी.सेवा विस्कळीत; विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचे हाल वाढले

चिंचखेडा बुद्रुकमध्ये एस.टी.सेवा विस्कळीत; विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचे हाल वाढले

मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक येथे राज्य परिवहन महामंडळाच्या अनियमित व निष्काळजी कारभारामुळे विद्यार्थ्यांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावात बस थांबत नसल्याने शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.दररोज सकाळ-संध्याकाळ विद्यार्थ्यांना रस्त्यावर उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते; मात्र अनेकदा बस न थांबता पुढे निघून जात असल्याचे चित्र आहे. उन्हाळा, पावसाळा अशा कोणत्याही परिस्थितीत दीर्घकाळ थांबण्याची वेळ येत असून, यामुळे प्रवाशांचा त्रास अधिकच वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तसेच नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या