Monday, April 27, 2026
police dakshta logo
Homeजळगावमुंबईतील प्रतिष्ठित मॉडेलिंग फोटोग्राफी इव्हेंटमध्ये जळगावच्या तेजस भंगाळे यांची निवड

मुंबईतील प्रतिष्ठित मॉडेलिंग फोटोग्राफी इव्हेंटमध्ये जळगावच्या तेजस भंगाळे यांची निवड

क्रिएटिव्ह फोटोग्राफीमुळे ओळख निर्माण; राज्यस्तरावर कामगिरी सादर करण्याची संधी

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मुंबई येथे लवकरच होणाऱ्या मॉडेलिंग फोटोग्राफी इव्हेंटमध्ये जळगाव येथील युवा फोटोग्राफर तेजस भंगाळे यांची निवड झाली आहे. फोटोग्राफी क्षेत्रात सातत्याने नवे प्रयोग करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तेजस यांच्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे.क्रिएटिव्ह संकल्पना, आकर्षक लोकेशन्सची निवड आणि दर्जेदार सादरीकरण या वैशिष्ट्यांमुळे तेजस भंगाळे यांनी अल्पावधीतच फोटोग्राफी क्षेत्रात आपली छाप पाडली आहे. मॉडेल शूट्स, प्री-वेडिंग प्रोजेक्ट्स तसेच जाहिरात क्षेत्रातील कामांमुळे त्यांची ओळख अधिक ठळक झाली आहे.मुंबईत होणाऱ्या या इव्हेंटमध्ये देशभरातील नामवंत फोटोग्राफर्स आणि मॉडेल्स सहभागी होणार असून, तेजस यांना आपल्या कलेचे प्रदर्शन करण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळणार आहे. त्यांच्या सहभागामुळे जळगाव जिल्ह्याचे नाव राज्यपातळीवर झळकण्याची संधी निर्माण झाली आहे.

तेजस भंगाळे यांच्या या यशस्वी वाटचालीबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी काळात ते आणखी मोठ्या प्रकल्पांमध्ये झळकतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या