Tuesday, September 15, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणमित्रांच्या स्नेहमेळाव्यात प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन यांचा स्वप्नपूर्ती सोहळा

मित्रांच्या स्नेहमेळाव्यात प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन यांचा स्वप्नपूर्ती सोहळा

एसएससी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; दत्तक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील मी इंग्लिश स्कूलच्या १९९०-९१ बॅचच्या ‘सवंगडी ग्रुप’च्या वतीने वर्गमित्र तथा नशिराबाद नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष पंकज भाऊ महाजन यांच्या स्वप्नपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी पंकज महाजन व त्यांच्या पत्नीचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात शालांत परीक्षा (एसएससी) २०२६ मध्ये उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. प्रथम क्रमांक कुमारी पूजा किरण पाटील, द्वितीय क्रमांक कुमारी वनिता ललित तळले हिने मिळविला. तृतीय क्रमांकासाठी समान गुण मिळाल्याने कुमारी भूमिका पुरुषोत्तम गायकवाड व कुमारी देवयानी दिलीप महाजन या दोघींचाही सन्मान करण्यात आला.दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रुपच्या वतीने दत्तक घेतलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना वर्षभरासाठी आवश्यक शालेय कपडे व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.दरम्यान, ग्रुपच्या वर्गमित्रांची कन्या कुमारी यशश्री संतोष कोष्टी हिची मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर-क्लार्क पदावर नियुक्ती झाल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करून भेटवस्तू देण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरुवातीस दिवंगत वर्गमित्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद रंधे यांनी केले. यावेळी सुनील पांढरकर, संजय पाटील, डॉ. प्रमोद आमोदकर, मनोज नाईक, भालचंद्र चौधरी, युवराज महाजन आणि अरुण कोष्टी यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन राजेंद्र भालशंकर यांनी केले, तर आभार विजय गायकवाड यांनी मानले.यावेळी १९९०-९१ बॅचचे वर्गमित्र सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते. जुन्या स्नेहबंधांना उजाळा देत सामाजिक बांधिलकी जपणारा हा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या