Sunday, July 5, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणनशिराबाद सार्वजनिक वाचनालयाची वार्षिक सभा आज

नशिराबाद सार्वजनिक वाचनालयाची वार्षिक सभा आज

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील शंभराहून अधिक वर्षांची परंपरा लाभलेल्या सार्वजनिक वाचनालय संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. ५) सकाळी ९.३० वाजता वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. तालुका ‘ब’ दर्जाचे मानांकन असलेल्या या वाचनालयाच्या सभेत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. सभेच्या प्रारंभी शोकप्रस्ताव मांडण्यात येणार असून मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून मंजुरीसाठी ठेवण्यात येईल. याशिवाय संस्थेच्या आर्थिक वर्षातील जमा-खर्चाचा ताळेबंद, आगामी वर्षाचे अंदाजपत्रक तसेच खर्चातील वाढ-घट यास मान्यता देण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. वाचनालयाच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा अहवालाच्या स्वरूपात सभासदांसमोर सादर केला जाणार आहे. तसेच लेखापरीक्षकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरही पूर्तता केली जाणार आहे. वाचनालयात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके व मासिकांच्या संदर्भात सभासद आणि वाचकांच्या सूचनांवरही विचारविनिमय होणार आहे. सभेसंदर्भातील अजेंडा सभासदांना पाठविण्यात आला असून सर्व सभासदांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद पितांबर आमोदकर, कार्याध्यक्ष जनार्दन शामराव माळी तसेच सचिव ॲड. प्रदीप मुरारी देशपांडे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या