Monday, September 14, 2026
police dakshta logo
Homeजळगावसंस्कृती माध्यमिक विद्यालयात गणरायाचे उत्साहात आगमन: लेझीम व ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तीची मिरवणूक;...

संस्कृती माध्यमिक विद्यालयात गणरायाचे उत्साहात आगमन: लेझीम व ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तीची मिरवणूक; जयश्रीताई सुनील महाजन यांच्या हस्ते स्थापना

जळगाव | प्रतिनिधी :- श्री गणेश चतुर्थीनिमित्त जळगाव येथील संस्कृती माध्यमिक विद्यालयात श्री गणेशमूर्तीची स्थापना मोठ्या उत्साहात व जल्लोषात करण्यात आली. विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनानिमित्त विद्यालय परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.गणेशमूर्तीची गणपती मंदिरापासून लेझीम व ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांसह उपस्थितांनी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून टाकला.त्यानंतर जळगाव शहराच्या माजी महापौर तथा फाउंडेशन मेहरूण संचलित संस्थेच्या अध्यक्ष जयश्रीताई सुनील महाजन यांच्या हस्ते श्री गणेशमूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली. यानंतर गणेश पूजन व आरती करण्यात आली. आरतीनंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गणेशोत्सवाचा प्रारंभ भक्तिमय व आनंदी वातावरणात झाला.

 

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या