Saturday, October 3, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यासेवा संकल्प अभियानांतर्गत महावितरणची स्वच्छता मोहीम

सेवा संकल्प अभियानांतर्गत महावितरणची स्वच्छता मोहीम

नशिराबाद उपकेंद्राच्या यार्डात अधिकारी-कर्मचाऱ्यांचे श्रमदान; विद्युत सुरक्षिततेला प्राधान्य

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- सेवा संकल्प अभियानांतर्गत महावितरणच्या नशिराबाद शहर कक्षातर्फे नशिराबाद उपकेंद्राच्या यार्ड परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष श्रमदान करून परिसरातील वाढलेले गवत, झुडपे व अनावश्यक वनस्पती हटवून स्वच्छता केली.नशिराबाद शहर कक्षाचे सहाय्यक अभियंता पवन सुधाकर वाघुळदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. उपकेंद्रातील विद्युत उपकरणे, ट्रान्सफॉर्मर, स्विचयार्ड तसेच इतर यंत्रसामग्रीच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.उपकेंद्र परिसरात गवत व झुडपे वाढल्यास विद्युत उपकरणांची पाहणी, देखभाल-दुरुस्ती तसेच आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक कामे करताना अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वच्छतेसोबतच विद्युत सुरक्षिततेच्या दृष्टीनेही या मोहिमेला महत्त्व देण्यात आले.स्वच्छता, सुरक्षितता आणि सामाजिक बांधिलकी या त्रिसूत्रीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी नियमित विद्युत सेवा बजावत असतानाच आपल्या कार्यक्षेत्रातील परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्याचा आदर्श निर्माण केला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या