Saturday, October 3, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणसेवा संकल्प अभियानात महावितरणचा सक्रिय सहभाग

सेवा संकल्प अभियानात महावितरणचा सक्रिय सहभाग

अवयवदान संकल्प, स्वच्छता मोहीम व जनजागृतीपर बाईक रॅलीत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ मध्ये महावितरणच्या नशिराबाद शहर कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शहर कक्षाचे सहाय्यक अभियंता पवन सुधाकर वाघुळदे यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.या अभियानांतर्गत अवयवदान संकल्प अभियान, स्वच्छता मोहीम तसेच जनजागृतीपर बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेत श्रमदान केले. तसेच अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासह नागरिकांमध्ये स्वच्छता व सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी बाईक रॅलीत सहभाग घेतला.नशिराबाद शहरातून काढण्यात आलेल्या जनजागृतीपर बाईक रॅलीद्वारे नागरिकांना स्वच्छता, सामाजिक सेवा आणि अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला.यावेळी नशिराबाद नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा नगरसेवक लालचंद पाटील, मुख्याधिकारी सोनवणे साहेब, तसेच सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

‘सेवा संकल्प अभियान २०२६’च्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांना चालना देत विविध शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांनी एकत्रितपणे सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संदेश दिला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या