नशिराबादमध्ये सेवा संकल्प अभियानांतर्गत भाजपतर्फे रांगोळी स्पर्धा
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- नशिराबाद येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवेला अभिवादन करण्याच्या उद्देशाने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेला विविध मंडळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंडळातील महिला तसेच कार्यकर्त्यांनी आपल्या कलाकृतीतून विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करणाऱ्या आकर्षक व कल्पक रांगोळ्या साकारल्या. देशप्रेम, ‘बेटी बचाव, बेटी पढाव’, सक्षम भारत यांसह सामाजिक बांधिलकी आणि सकारात्मक विचारांचे दर्शन या रांगोळ्यांमधून घडविण्यात आले.
RELATED ARTICLES

