Sunday, June 7, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यावाघुर धरणाच्या डाव्या कालव्याचे शेतकरी तुपाशी आणि उजव्या कालव्याचे उपाशी ?

वाघुर धरणाच्या डाव्या कालव्याचे शेतकरी तुपाशी आणि उजव्या कालव्याचे उपाशी ?

धरण प्रशासनाची दुटप्पी भूमिका

भुसावळ | जितेंद्र काटे | पोलीस दक्षता लाईव्ह :– जून महिन्याला सुरुवात झाली नेहमी रोहिण्या लागल्यावर कुठेना कुठे पाऊस पडायचा मात्र आता शेतकरी आकाशाकडे बघत आहे परंतु लवकर पाऊस पडेल असे दिसत नाही त्यामुळे पाटाच्या पाण्यावर शेतकरी अवलंबून आहे परंतु धरणाचे प्रशासन शेतकऱ्यांना हुलकावणी देत आहे नेहमी प्रमाणे वाघुर धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी पुरवठा सुरू आहे मात्र उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यासाठी वारंवार विनवणी करावी लागते आहे त्यामुळे वाघुर धरणाच्या डाव्या कालव्याचे शेतकरी तुपाशी आणि उजव्या कालव्याचे शेतकरी उपाशी म्हणण्याची वेळ आली आहे.

वाघुर धरणाच्या कालव्यातून नेहमी प्रमाणे डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी पुरवठा केला जात असे, याच कालव्यातून खरीप व रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्यात येत होते.मात्र मागील वर्षांपासून डाव्या कालव्यातून खरीप व रब्बी हंगामासाठी नियमितपणे आवर्तन सोडण्यात आले परंतु उजव्या कालव्याच्या दुरुस्तीचे कारण देत रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्यात आले नाही परिणामी या परिसरातील शेतकरी रब्बी हंगामा पासून वंचित राहून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता याच उजव्या कालव्याच्या पाण्यावर मे महिन्यात कपाशी लागवड करण्यात येणार होती मात्र आवर्तन सोडण्यात येणार की नाही या संभ्रमात शेतकरी राहिला आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची वाट पाहतच राहिला.

आता डाव्या कालव्यातून पाणी पुरवठा सुरू आहे मात्र उजव्या कालव्यातून अजूनही आवर्तन सोडण्यात आले नाही त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडले असून वाघुर धरणाचे प्रशासन जाणूनबुजून शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचे बोलले जाते आहे.तर काही गावातील सरपंच पदाधिकारी व शेतकऱ्यांनी उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी पत्र पाठविले असल्याचे समजते त्यामुळे आतातरी वाघुर धरणाच्या प्रशासनाने शेतकऱ्यांचा विचार करून उजव्या कालव्यातून खरीप हंगामासाठी आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या