Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमवरणगावात गुन्हे शाखेची कारवाई : विनापरवाना शस्त्रासह आरोपी जेरबंद

वरणगावात गुन्हे शाखेची कारवाई : विनापरवाना शस्त्रासह आरोपी जेरबंद

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी सो. यांच्या आदेशानुसार, आगामी सण-उत्सव तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठ पोलिस निरीक्षक (गुन्हे शाखा) श्री. राहुल गायकवाड यांना देण्यात आले होते.

त्याच अनुषंगाने, स्था. गुन्हे शाखेचे पथक वरणगाव येथे मोठ्या गोपनीय माहितीच्या आधारे रवाना झाले. गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, वरणगाव शहरातील रेकॉर्डवरील आरोपी संजय गोपाळ चंडेले (वय ५०, रा. दर्यापुर शिवार, ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगाव) हा विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगून फिरत असून, त्याद्वारे परिसरात दहशत निर्माण करीत आहे.

या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांनी तत्काळ एक विशेष पथक तयार केले. या पथकाने बुधवारी रात्री ८ ऑक्टोबर रोजी वरणगाव शहरातील तिरंगा चौकात सापळा रचला. सुमारे रात्री ११.३० वाजेच्या सुमारास संशयित व्यक्ती झाडाजवळ उभा असल्याचे दिसून आले. पोलिस पथकाने तत्काळ त्या इसमाला वेढा घालून पकडले. विचारपूस केल्यानंतर त्याने स्वतःचे नाव संजय गोपाळ चंडेले (वय ५०, रा. दर्यापुर शिवार, ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगाव) असे सांगितले. पथकाने केलेल्या अंगझडतीत ५०,५०० रुपयांची दोन गावठी पिस्तुले आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या कारवाईनंतर आरोपीविरुद्ध वरणगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा क्र. २१३/२०२५, भा. दं. वि. कलम आर्म्स अ‍ॅक्ट ३/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेको सुभाष सपकाळ हे करीत आहेत.

दरम्यान, आरोपी संजय चंडेले याच्यावर यापूर्वीही खालीलप्रमाणे आर्म्स अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल असल्याचे पोलिस नोंदीतून समोर आले आहे –
१) गुन्हा क्र. ०२/२०२२ आर्म्स अ‍ॅक्ट ३/२५ नुसार.
२) गुन्हा क्र. २८/२०२२ आर्म्स अ‍ॅक्ट ३/२५ नुसार.

सदर कारवाई मा. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मा. अप्पर पोलिस अधीक्षक श्री. अशोक नखाते, तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक (गुन्हे शाखा) श्री. राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पो. उपनिरीक्षक शरद बागल, ग्रे पो. उ.नि. रवी नरवाडे, पोहेको गोपाळ गव्हाळे, पोहेको उमाकांत पाटील, पोना विकास सातदीवे, पोना श्रीकृष्ण देशमुख, पोका प्रशांत परदेशी, पोकों राहुल वानखेडे, चा.पोका भारत पाटील यांनी सहभाग घेतला.

पोलिसांच्या या वेळी दाखवलेल्या तत्परतेमुळे वरणगाव परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, आगामी उत्सव काळात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात सुरू झालेली ही मोहीम अधिक कडक करण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या