Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानशिराबाद नगरपरिषद निवडणूक : भाजप–शिंदे सेना युती विरुद्ध AIMIM व राष्ट्रवादी अजित...

नशिराबाद नगरपरिषद निवडणूक : भाजप–शिंदे सेना युती विरुद्ध AIMIM व राष्ट्रवादी अजित पवार गट?

तिकीट न मिळालेल्या इच्छुकांची बंडखोरी ; अपक्षांचीही वाढती लगबग व त्यांना AIMIM चा मिळणारा पाठिंबा

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीत आता राजकीय समीकरणे झपाट्याने बदलू लागली आहेत. भाजप आणि शिंदे गटाची युती जवळपास अंतिम टप्प्यावर असून, दोन्ही पक्षांकडून तिकीट वाटपासाठी सर्वपक्षीय इच्छुकांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातील विरोध शमविण्यात युतीला मोठ्या प्रमाणात यश मिळाल्याचे सूत्रांकडून समजते.

एका मोठ्या पक्षातील मातब्बर नेता शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे सेनेत प्रवेश करणार.

आज संध्याकाळी एका मोठ्या पक्षातील मातब्बर नेते शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती असून, यामुळे युतीची पायाभरणी अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे भाजप व शिंदे गटाकडून तिकीट न मिळालेल्या काही इच्छुकांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे धाव घेतली असून, या गटाच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची तयारी त्यांनी केली आहे. AIMIM देखील रणनिती आखत असून, ते प्रामुख्याने अपक्ष आणि नाराज बंडखोर उमेदवारांना पाठिंबा देऊन त्यांच्याशी हातमिळवणी करतांना दिसून येत आहेत. त्यामुळे नशिराबादमध्ये भाजप–शिंदे सेना युती विरुद्ध AIMIM व राष्ट्रवादी अजित पवार गट असे त्रिकोणी चित्र निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

सोशल मीडियावर “भावी नगरसेवक”..एका घराआड नगरसेवक.

दरम्यान, तिकीटावर नाराजी व्यक्त करून काही उमेदवारांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. बंडखोर उमेदवारांमुळे प्रमुख राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली असून, त्यांची समजूत काढण्यासाठी पक्षश्रेष्ठी वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न करत असल्याचे दिसून येते.निवडणूक अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी NOC घेण्यासाठी कार्यालयात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सर्व वॉर्डांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोशल मीडियावर “भावी नगरसेवक” अशा पोस्टचे प्रमाण वाढले असून, “नशिराबादमध्ये एका घराआड नगरसेवक तयार होतो की काय?” असा जनतेत चर्चेचा विषय बनला आहे.

भाजपचे एक ज्येष्ठ मातब्बर नेते हे आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात.

गेल्या चार ते पाच वर्षांपासून नशिराबादच्या सक्रिय राजकारणापासून दूर असलेले भाजपचे एक ज्येष्ठ मातब्बर नेते हे आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरण्याची तयारी करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यांच्या पुनरागमनामुळे निवडणूक अधिकच रोचक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.आगामी काही काळात नशिराबाद नगरपरिषद निवडणूक अधिक रंगतदार होणार असून, स्थानिक राजकारणात “नवीन परिवर्तनाचे वारे” वाहण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या