Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमओला ईलेक्ट्रिक मोटारसायकलची बॅटरी व MCU असेंबली चोरी प्रकरणी दोन अटकेत ;...

ओला ईलेक्ट्रिक मोटारसायकलची बॅटरी व MCU असेंबली चोरी प्रकरणी दोन अटकेत ; ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त

एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथील ओला इलेक्ट्रिक सर्व्हिस सेंटरसमोरून ओला कंपनीच्या ईलेक्ट्रिक मोटारसायकलची बॅटरी व MCU असेंबली चोरी करणाऱ्या चोरट्यांना एम.आय.डी.सी. पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे ५७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.दि. ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजेपासून ते दि. १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या संमतीविना ओला कंपनीच्या मोटारसायकलची बॅटरी व MCU असेंबली चोरी केली होती. याप्रकरणी फिर्यादी यांनी दि. २० जानेवारी २०२६ रोजी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड यांनी तात्काळ गुन्हे शोध पथक गठीत केले. या पथकात पोउपनि राहुल तायडे, पोउपनि चंद्रकांत धनके, पो.हे.का. गिरीश पाटील, पो.का.निलेश पाटील, पो.का.शशिकांत मराठे व पो.का.रमाकांत साळुंखे यांचा समावेश होता.

गुन्हे शोध पथकाने घटनास्थळ तसेच जळगाव शहरातील विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला असता आरोपी १) अब्दे अली शब्बीर नगरी (वय २८, व्यवसाय – मजुरी, रा. अरसिवाला कॉलनी, शिवाजीनगर, जळगाव), २) साकीब खान इरफान खान सिकलगर (वय २२, व्यवसाय – मजुरी, रा. सालारनगर, जळगाव) यांची ओळख पटली. आरोपींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एकूण ५७ हजार रुपये किमतीची ओला कंपनीची ईलेक्ट्रिक मोटारसायकलची बॅटरी व MCU असेंबली हस्तगत करण्यात आली आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे.का गिरीश पाटील व पो.का.निलेश पाटील करीत आहेत.सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या