Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावरस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त जळगाव पोलिसांची हेल्मेट रॅली ; १६० कर्मचाऱ्यांचा शिस्तबद्ध सहभाग

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त जळगाव पोलिसांची हेल्मेट रॅली ; १६० कर्मचाऱ्यांचा शिस्तबद्ध सहभाग

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षात लाईव्ह :- शहरात सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताह २०२६च्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे गुरुवारी सायंकाळी भव्य दुचाकी हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीद्वारे नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली.मा.पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीला दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजता पोलिस मुख्यालयातून सुरुवात झाली. पोलीस अधीक्षकांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ केला.

या रॅलीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे १६० पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. विशेष बाब म्हणजे, सर्व सहभागी पोलीस कर्मचाऱ्यांनी हेल्मेट परिधान करून दुचाकी चालवली. ‘आधी स्वतः नियमांचे पालन, मग नागरिकांना संदेश’ असा आदर्श पोलिसांनी यावेळी घालून दिला.रॅलीचा मार्ग पोलिस मुख्यालय–आकाशवाणी चौक–काव्यरत्नावली चौक–गाडगे बाबा चौक मार्गे महाबळ चौक असा होता. संपूर्ण मार्गावर ही रॅली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. हेल्मेट वापराचे महत्त्व, सुरक्षित वाहनचालना आणि रस्ते अपघात टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला.

दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर अनिवार्य असून, रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे, यावर पोलिसांनी यावेळी भर दिला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या