मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…
जळगाव/प्रमोद सोनार/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या (२२) वर्षीय तरुणीचा चेहरा वापरून बनावट अश्लील फोटो बनवीत हॉस्टेल इन्चार्जला पाठवण्यात आल्याचा प्रकार शहरात घडला असून संशयीताने तरुणीला तातडीने होस्टेलमधून काढून टाका,नाहीतर फोटो इतरत्र व्हायरल करण्याची धमकी दिली. या संदर्भात संबंधित मोबाईल क्रमांक धारकाविरुद्ध पिडीत विद्यार्थिनीने जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे की (२२) वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादी नुसार, तरुणी ही जळगावातील अभियांत्रिकी महाविद्यालयता शिक्षण घेण्यासाठी आली असून तेथील हॉस्टेलमध्ये वास्तव्यास आहे. संशयित आरोपीने +1239- 6766240 या क्रमांकावरून पीडीतेचा चेहरा वापरून अश्लील फोटो तयार करून 22 मार्च रोजी हॉस्टेल इन्चार्जला पाठवले तसेच या विद्यार्थिनीला हॉस्टेलमधून काढून टाकले नाही तर हे फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहेत.