Thursday, September 24, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणमन्यारखेडा येथील ग्रह-राशी-नक्षत्र मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची कीर्तनाने भावपूर्ण सांगता

मन्यारखेडा येथील ग्रह-राशी-नक्षत्र मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची कीर्तनाने भावपूर्ण सांगता

मन्यारखेडा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मन्यारखेडा येथे उभारण्यात आलेल्या विश्वातील एकमेव ग्रह, राशी व नक्षत्र मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची भावपूर्ण सांगता दि. १० एप्रिल रोजी काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली. दि. २८ मार्चपासून सुरू असलेल्या या भव्य धार्मिक सोहळ्यात विविध आध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.समारोपाच्या कार्यक्रमात श्री बदरीनाथ मंदिर संस्थानचे गादीपती प. पू. स. गु. श्री मयूरगोविंदजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. या कीर्तनासाठी परिसरातील तसेच दूरदूरच्या गावांमधून हजारो भक्तांनी उपस्थिती लावली होती.कीर्तनानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने मन्यारखेडा परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने करण्यात आली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या