Monday, April 20, 2026
police dakshta logo
Homeक्राईमप्रेमाच्या आमिषातून अत्याचार; नाशिकमध्ये तरुणावर गंभीर गुन्हा, आरोपी अटकेत

प्रेमाच्या आमिषातून अत्याचार; नाशिकमध्ये तरुणावर गंभीर गुन्हा, आरोपी अटकेत

नाशिक | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नाशिक शहरात महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढवणारे आणखी एक गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. एका तरुणाने ओळखीच्या माध्यमातून तरुणीला विश्वासात घेत तिच्याशी जवळीक साधली आणि त्यानंतर तिला धमकावून लॉजमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाने सुरुवातीला तरुणीशी मैत्री करत तिला फिरायला नेले. त्यानंतर तिचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिला जबरदस्तीने लॉजवर नेल्याचे तक्रारीत नमूद आहे. तेथे तिला मद्य व सिगारेट देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला, तसेच अश्लील फोटो व व्हिडिओ तयार करण्यात आल्याचा आरोप आहे.याशिवाय, अत्याचारानंतर तिच्या अंगावरील धार्मिक चिन्हे काढून विशिष्ट पद्धतीचे कृत्य करण्यास भाग पाडल्याचेही पीडितेने पोलिसांना सांगितले आहे. या सर्व प्रकारामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे.

दरम्यान, आरोपीच्या बाजूने हे परस्पर संमतीचे प्रकरण असल्याचा युक्तिवाद करण्यात आला असला तरी पोलिसांनी प्राथमिक तपासाअंती गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवून कारवाई केली आहे. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या काळात घटनेतील सर्व बाबींचा सखोल तपास करण्यात येणार आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संघटनांनी निषेध व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. शहरात सलग घडणाऱ्या अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या