Saturday, April 18, 2026
police dakshta logo
Homeक्राईमरिक्षा चोरीचा गुन्हा उघड : आरोपी अटकेत, चोरीची रिक्षा जप्त

रिक्षा चोरीचा गुन्हा उघड : आरोपी अटकेत, चोरीची रिक्षा जप्त

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील सिव्हील हॉस्पिटल परिसरातून चोरीस गेलेली रिक्षा अवघ्या काही दिवसांत शोधून काढत जिल्हापेठ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेली रिक्षाही जप्त करण्यात आली असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी जळगाव येथील सिव्हील हॉस्पिटलच्या गेट क्रमांक ३ समोरील पार्किंगमधून एमएच १९ बीजे ४०२५ क्रमांकाची तीनचाकी ऑटो रिक्षा चोरीस गेली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे १३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला. तपासादरम्यान कल्पेश ज्ञानेश्वर इंगळे (वय ३२, रा. रामेश्वर कॉलनी, मेहरूण, जळगाव) याच्यावर संशय बळावला.दरम्यान, पथक पेट्रोलिंग करत असताना पांडे डेअरी चौकाजवळील एमएसईबी कार्यालयाजवळ संशयित रिक्षा आढळून आली. पोलिसांनी रिक्षा थांबवून चालकाची चौकशी केली असता त्याने आपली ओळख कल्पेश इंगळे अशी सांगितली. पुढील चौकशीत त्याने सिव्हील हॉस्पिटल परिसरातून रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली.पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे ७५ हजार रुपये किमतीची काळ्या-पिवळ्या रंगाची पॅजो (ऑटो) रिक्षा जप्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक कमलेश पवार करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत मिलिंद सोनवणे, कमलेश पवार, तुषार पाटील, गोविंद साबळे, नरेंद्र दिवेकर व प्रविण जाधव यांनी सहभाग नोंदविला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या